रिंकू राजगुरूने फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 15:01 IST2021-03-12T15:00:01+5:302021-03-12T15:01:58+5:30

रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती परफेक्ट फिगर दिसते आहे.

Rinku Rajguru flaunted the perfect figure, a shower of comments on the photo | रिंकू राजगुरूने फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

रिंकू राजगुरूने फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.


रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती परफेक्ट फिगर दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत फ्री असे लिहित फुलपाखरूची इमोजी शेअर केली आहे. रिंकूच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 


हल्ली रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टपेक्षा तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. ती दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे. तिचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावतोदेखील आहे.


रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.


या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.


प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Rinku Rajguru flaunted the perfect figure, a shower of comments on the photo