आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:42 IST2025-06-03T11:42:12+5:302025-06-03T11:42:52+5:30

रिंकूच्या आईनेही पोस्ट शेअर करत लिहिले...

rinku rajguru celebrating birthday today her childhood photo in boycut went viral | आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष

आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष

'सैराट' या अजरामर मराठी सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आज वाढदिवस साजरा करत आहे. रिंकूला आजही अनेकजण 'सैराट'ची आर्ची म्हणूनच हाक मारतात. पहिल्याच सिनेमातून तिला ही ओळख मिळाली.  सिनेमाच्या शूटवेळी रिंकू फक्त नववीत होती. एवढ्या कमी वयातही तिने अप्रतिम काम केलं. आज रिंकू किती वर्षांची झाली माहितीये का?

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. आज ती २४ वर्षांची झाली आहे. अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत अनेकांनी तिचे जुने जुने फोटोही पोस्ट केले आहेत. त्यातच रिंकूच्या शाळेतल्या फोटोने लक्ष वेधलंय. मोठा पांढरा शर्ट, काळी पँट आणि बॉयकॉट अशा लूकमधील तिचा शाळेतला लहानपणचा फोटो समोर आला आहे. यामध्ये ती अगदीच क्युट दिसत आहे. ती माईकसमोर उभं राहून बोलतानाचा हा फोटो आहे. 

याशिवाय रिंकूच्या आईनेही गोड फोटो शेअर करत लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. या पोस्टवरही चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


वर्कफ्रंट

'सैराट'नंतर रिंकूने काही हिंदी सीरिजमध्येही काम केलं. तसंच ती 'कागर','झुंड','२०० हल्ला हो' या सिनेमांमध्येही दिसली. मात्र तिला फारसं यश मिळालं नाही. २०२३ साली आलेल्या 'झिम्मा २' मध्ये तिची जादू पुन्हा चालली. निर्मिती सावंत यांच्यासोबत तिची जुगलबंदी प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केली. आता रिंकू 'साडे माडे तीन'च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे.

Web Title: rinku rajguru celebrating birthday today her childhood photo in boycut went viral