बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही लाजवेल या मराठमोळ्या अभिनेत्रीची मुलगी, फोटोत दिसते बघा किती सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 16:57 IST2020-08-31T16:57:19+5:302020-08-31T16:57:52+5:30

रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

Resham tipnis daughter look so gorgeous, SEE PICS | बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही लाजवेल या मराठमोळ्या अभिनेत्रीची मुलगी, फोटोत दिसते बघा किती सुंदर

बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही लाजवेल या मराठमोळ्या अभिनेत्रीची मुलगी, फोटोत दिसते बघा किती सुंदर


रेशम टीपणीस च्या इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की रेशम तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय रेशमचे सौंदर्य आजही अबाधित आहे. रेशमने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत तरीही तिच्या फोटोंकडे पाहिले असता आपल्याला तिच्या वयाचा अंदाजा लावणे मुश्किल आहे. रेशमप्रमाणेच तिची मुलगी देखील तिच्याचसारखी सुंदर आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरही रिशिका सक्रीय आहे.इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर रेशम आणि रिशिका दोघींचं एकमेकींवर असलेले प्रेम पाहायला मिळतं. 

रिशिका सध्या 2४ वर्षांची असून तिचं तिच्या आईशी म्हणजे रेशमशी विशेष नातं आहे. रेशमच्या लेकीचा आवाज तर साऱ्या जगाने ऐकला. त्यावरुन ती बरीच समंजस असल्याचे यावेळी दिसून आलं. मात्र प्रत्यक्ष जीवनात रिशिका ही आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे. रिशिकाचा एक फोटो समोर आला असून त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे. 

आईप्रमाणेच रिशिकाही मॉर्डन विचारांची आहे. रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून रिशिका दूर असली तरीही स्टाइलच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते. नुसते स्टाइलिश लूकच नाहीतर फिटनेसवरही ती अधिक लक्ष देत असल्याचे तुम्हाला तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळेल. रिशिकाचे विविध फोटोंवर तुम्ही नजर टाकली तर  बॉलिवूडमधील स्टारकिडसना तर सोडाच अभिनेत्रींनाही टक्कर देत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.

Web Title: Resham tipnis daughter look so gorgeous, SEE PICS