रेणुका शहाणे गेली ब्रेकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 16:02 IST2017-04-24T10:32:53+5:302017-04-24T16:02:53+5:30
रेणुका शहाणेने तिच्या करियरच्या सुरुवातीला सर्कस, सैलाब यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आज तिच्या मालिकांना अनेक वर्षं होऊन ...
.jpg)
रेणुका शहाणे गेली ब्रेकवर
र णुका शहाणेने तिच्या करियरच्या सुरुवातीला सर्कस, सैलाब यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आज तिच्या मालिकांना अनेक वर्षं होऊन गेले असले तरी या मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हम आपके है कौन या चित्रपटातील रेणुकाच्या भूमिकेला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. गेल्या काही वर्षांत संसारात आणि मुलात रमल्यानंतर ती अभिनयापासून काहीशी दूर गेली होती. पण ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
रेणुका शहाणे नेहमीच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर अॅक्टिव्ह असते. ती ट्विटरच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी संपर्क साधत असते. तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत असते. तिच्या मुलाचे फोटो, आशुतोष राणासोबतचे तिचे फोटोदेखील ट्विटरवर पोस्ट करत असते. यामुळे तिचे फॅन्स नेहमीच तिच्या ट्वीटची आणि पोस्टची उत्सुकतेने वाट पाहात असतात. तिच्या ट्विटर अकाऊंटला 21 हजाराहून अधिक फॉलोव्हर्स असून तिचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाइडदेखील झालेले आहे. पण रेणुकाला ट्विटरला फॉलो करणाऱ्या तिच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. काही दिवस तरी रेणुका ट्विटरवर अॅक्टिवर नसणार आहे आणि तिने स्वतः ही बातमी तिच्या फॅन्सना ट्वीट करून सांगितली आहे. रेणुका आजारी असल्याने काही दिवस तिने आराम करण्याचे ठरवले आहे. याकाळात ती सोशल मीडियापासून दूर राहाणार आहे. त्याविषयी तिने ट्वीट करून म्हटले आहे की, माझ्या मित्रमैत्रिणींनो काही दिवस मला ट्विटरवरून ब्रेक घ्यावा लागत आहे. माझे स्नायू दुखावले गेले असल्याने डॉक्टरांनी काही दिवस तरी मला आराम करायचा सल्ला दिला आहे. माझी तब्येत पूर्णपणे बरी झाल्यानंतरच मी परतेल.