'शुभ लग्न सावधान'मधील 'साज सोन्याचा' गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 14:50 IST2018-10-02T14:44:27+5:302018-10-02T14:50:29+5:30

लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 Release 'Song Goldy Song' from 'Auspicious Wedding Suraksha' | 'शुभ लग्न सावधान'मधील 'साज सोन्याचा' गाणे रिलीज

'शुभ लग्न सावधान'मधील 'साज सोन्याचा' गाणे रिलीज

ठळक मुद्दे 'शुभ लग्न सावधान' सिनेमा लग्नसोहळ्यावर आधारित'शुभ लग्न सावधान' १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला


लग्न म्हटले की, लगीनघाई ही आलीच! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील साज सोन्याचा हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर दाखल झाले आहे. हे गाणे सुबोध भावे, श्रुती मराठे, गिरीजा ओक व निर्मिती सावंत, प्रतीक देशमुख व रेवती लिमये यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. 

'साज सोन्याचा' या गाण्याला पल्लवी केळकर हिने स्वरसाज दिला आहे. हे गाणे मंगेश कागणेच्या लेखणीतून साकार झाले आहे. या गाण्याला चिनार व महेश यांनी संगीत दिले आहे.

'बंध नायलॉन'चे या मराठी सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी ही जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे. सुबोध आणि श्रुती यांच्यासह डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, किशोरी अंबिये, आनंद इंगळे अशी दमदार कलाकारांची तगडी फौज असणार आहे. या सिनेमाचं शुटिंग दुबई आणि इगतपुरीमध्ये झाले आहे. लग्नाच्या निमित्ताने कुटुंबीय,नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येतात. त्यानंतर कशी धम्माल,मजामस्ती होते, नात्यांचे बंध कसे उलगडतात हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. विवाहोत्सुकांना आपलासा करणारा हा सिनेमा, कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून आकारास आला आहे. तसेच या सिनेमास तृप्ती पुराणिक आणि त्यांच्या स्टुडियो एलिमेंटस्ने निर्मिती सहाय्य केले आहे. सहनिर्मात्यांची धुरा अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी सांभाळली आहे. नवरात्रीच्या धामधुमीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट कुटुंबियांसोबत पाहायला जाण्यास प्रेक्षकदेखील नक्कीच आतुर झाले असतील, हे निश्चित!

Web Title:  Release 'Song Goldy Song' from 'Auspicious Wedding Suraksha'