हाफ तिकीटचे व्हीडीओ साँग रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 12:44 IST2016-05-30T07:14:12+5:302016-05-30T12:44:12+5:30

हाफ तिकीट या चित्रपटाची सध्या जोरादार हवा सुरु आहे. या चित्रपटाने नुकतेच कान्स मध्ये आपली झलक दाखविली असुन आता चित्रपटातील ऐका गाण्याचा व्हीडीओ

Release of Half Ticket Videotape | हाफ तिकीटचे व्हीडीओ साँग रिलीज

हाफ तिकीटचे व्हीडीओ साँग रिलीज


/>            हाफ तिकीट या चित्रपटाची सध्या जोरादार हवा सुरु आहे. या चित्रपटाने नुकतेच कान्स मध्ये आपली झलक दाखविली असुन आता चित्रपटातील ऐका गाण्याचा व्हीडीओ रिलीज करण्यात आला आहे. चल, चल, चल ,चल चल असे शब्द असलेले हाफ तिकीटचे हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. दोन भावांचे डे टु डे लाईफ या गाण्यात अतिशय सुंदर प्रकारे दाखविण्यात आले आहे. मुंबईतील रिअल लोकेशन्सवर या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. क्षितीज पटवर्धन यांचे बोल असुन हे गाणे हर्षवर्धन वावरे या गायकाने गायले आहे. दोन भाऊ जे मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांचा रेल्वे ट्रॅक, पाईपलाईन, डंपिंग ग्राऊंड या ठिकाणचा प्रवास या गाण्यात वास्तविक पद्धतीने मांडण्यात आला आहे. आता हे गाणे प्रेक्षकांना किती रिअ‍ॅलिस्टीक वाटतेय अन आवडतेय पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


 

Web Title: Release of Half Ticket Videotape