गावठी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सरसावला रेमो डिसोझा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 05:00 AM2018-02-07T05:00:29+5:302018-02-07T10:30:29+5:30

बॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या चित्रपटासाठी रेमो डिसोझासोबत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेला आनंदकुमार (ॲन्डी) आता गावठी ...

Reema D'Souza, Sarasavla for the promotion of Gawthi | गावठी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सरसावला रेमो डिसोझा

गावठी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सरसावला रेमो डिसोझा

googlenewsNext
लिवूड ब्लॉकबस्टर ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या चित्रपटासाठी रेमो डिसोझासोबत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेला आनंदकुमार (ॲन्डी) आता गावठी या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सिने दिग्दर्शनात पाऊल ठेवणार आहे. रेमोसोबत अनेक वर्षं अॅन्डी काम करत आहे. गुरू रेमो डिसोझाचा कित्ता गिरवीत केवळ नृत्य दिग्दर्शन नाही तर चित्रपट दिग्दर्शनातही आनंदकुमारने पदार्पण केले आहे. त्यामुळे आपल्या मित्राच्या पहिल्या प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी रेमो डिसोझा गावठी या चित्रपटाच्या संगीत आणि पोस्टर अनावरण सोहळ्यात सहभागी होणार आहे. रेमो डिसोझा आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव भाप्रसे डॉ. पी. अनबलगन यांच्या हस्ते संगीत आणि पोस्टर अनावरण होणार आहे. रेमोसोबत डान्स मास्टर पुनीत, धर्मेश, राघव आणि शक्ती मोहन ही ॲन्डीची दोस्तमंडळी देखील गावठीच्या प्रमोशनसाठी सरसावले आहेत. अश्विन भंडारे आणि श्रेयस आंगणे या संगीतकारांनी रचलेले गावठी चित्रपटातील सुमधुर प्रेमगीत व्हॅलेन्टाईन स्पेशल गिफ्ट ठरणार आहे.
या रंगारंग सोहळ्याला कथा लेखक आणि निर्माते आर. सिवाकुमार यांच्यासोबत चित्रपटातील प्रमुख कलाकार किशोर कदम, नागेश भोसले, कुशल बद्रीके, किशोर चौघुले, वंदना वाकनीस उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर चित्रपटातील रोमँटीक जोडी नवोदित कलाकार श्रीकांत पाटील आणि योगिता चव्हाण, रेमो डिसोझासोबत ‘दिसू लागलीस तू’ या प्रेमगीतावर थिरकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रस्तुतीसाठी पुढाकार घेणारे कासम अली, समीर दिक्षित आणि ऋषिकेश भिरंगी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गावठी...ग्रामीण, अशिक्षित आणि अपरिपक्व विचारांच्या, गचाळ राहणाऱ्या व्यक्तीला गावठी म्हणून संबोधले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गावठी संबोधल्याने त्याला एक प्रकारचा न्यूनगंड येतो. चांगल्या कपड्यातील, इंग्रजाळलेली शहरातील माणसे पाहिली की, मातृभाषेत बोलणाऱ्या शहरी माणसांनाही तुलनेने आपण गावठी असल्याचे भासत राहते. तर ग्रामीण लोकांची काय तऱ्हा होत असेल? पण, अशाच गावठी म्हणून हिणवल्या गेलेल्या व्यक्तींची बुद्धीमत्ता कमी नसते, कमी पडतो तो त्यांचा आत्मविश्वास!  तेव्हा हाच गावठी शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा प्रत्येकाला निखळ मनोरंजनाच्या माध्यमातून आत्मविश्वास देणारा, आर. बी. प्रोडक्शन निर्मित ‘गावठी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Also Read : ​रेमोचा मुलगा डान्स चॅम्पियन्समधील स्पर्धक पियूष भगतचा सर्वात मोठा चाहता

Web Title: Reema D'Souza, Sarasavla for the promotion of Gawthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.