"नखरेवाली कुठे निघाली...", किली पॉलने गायलं मराठी गाणं; व्हिडिओ पाहून तुम्ही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 16:50 IST2024-03-17T16:49:36+5:302024-03-17T16:50:17+5:30

'गुलाबी साडी' गाण्याची किली पॉलला भुरळ, मराठीतून गायलं गाणं

reel star kili paul sing gulabi sadi marathi song netizens reacted on video | "नखरेवाली कुठे निघाली...", किली पॉलने गायलं मराठी गाणं; व्हिडिओ पाहून तुम्ही कराल कौतुक

"नखरेवाली कुठे निघाली...", किली पॉलने गायलं मराठी गाणं; व्हिडिओ पाहून तुम्ही कराल कौतुक

सोशल मीडियावर अनेक गाणी व्हायरल होताना दिसतात. सध्या एका मराठमोळ्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. 'गुलाबी साडी' हे गाणं गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यावरील अनेक रीलही प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. माधुरी दीक्षितलाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आला नाही. आता किली पॉलला या गाण्याची भुरळ पडली आहे. 

टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉल भारतीय गाण्यांच्या प्रेमात आहे. बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत अनेक ट्रेंडिंग गाण्यांवर तो रील व्हिडिओ बनवताना दिसतो. आता त्याने गुलाबी साडी या गाण्यार व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत किली पॉल चक्क 'गुलाबी साडी' हे मराठी गाणं गाताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवरुन किली पॉलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओत किली पॉल अस्खलित मराठीत 'गुलाबी साडी' गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

किली पॉलने याआधीही अनेक मराठी गाण्यांवर रील व्हिडिओ बनवले आहेत. बहरला हा मधुमास गाण्यावरील त्याचा व्हिडिओ लोकप्रिय ठरला होता.तेव्हादेखील तो चर्चेत आला होता. किली पॉल हा रील स्टार आहे. अनेक बॉलिवूड गाण्यांवर व्हिडिओ बनवत तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 
 

Web Title: reel star kili paul sing gulabi sadi marathi song netizens reacted on video