​रझा यांच्या चित्राची विक्री 7.5 कोटींमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 20:46 IST2016-04-21T15:16:27+5:302016-04-21T20:46:27+5:30

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई येथे क्रिस्टिज् या संस्थेने केलेल्या लिलावात भारतीय चित्रकार एस. एच. रझा यांचे ‘बिंदू’ नावाचे ...

Raza's picture sold in 7.5 crores? | ​रझा यांच्या चित्राची विक्री 7.5 कोटींमध्ये?

​रझा यांच्या चित्राची विक्री 7.5 कोटींमध्ये?

ल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई येथे क्रिस्टिज् या संस्थेने केलेल्या लिलावात भारतीय चित्रकार एस. एच. रझा यांचे ‘बिंदू’ नावाचे चित्र आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.

खुल्या लिलावात या चित्राला 10 ते 15 कोटी रुपये किंमत मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, लिलावाच्या आधी चित्राच्या खºयापणाबद्दल शंका उपस्थित करण्यात येऊ लागली.

त्यामुळे ‘बिंदू’चा लिलाव होऊ शकला नाही. परंतु आता अशी माहिती येत आहे की, एका खाजगी लिलावात चित्राची विक्री झाली असून त्याला सुमारे 7.5 कोटी रुपये एवढी किंमत मिळाली आहे.

क्रिस्टिज्ने याविषयी कोणतेही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मते, खाजगी व्यावहारांची माहिती जाहीर करता येत नाही.

चित्रविश्वातील जाणकारांनी सांगितले की, खुल्या लिलावात विक्री न झाल्यामुळे चित्राच्या किंमतीवर नक्कीच परिणाम झाला आहे. परंतु खाजगी लिलावात किंमतीबाबत अनेक तडजोडी कराव्या लागतात. 

Web Title: Raza's picture sold in 7.5 crores?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.