कच्चा लिंबुचा सेल्फी म्हणजे नक्की काय असा प्रश्न तर पडलाच ्सेल ना. लिंबाचे नाव जरी ...
कच्चा लिंबुचा सेल्फी
/> कच्चा लिंबुचा सेल्फी म्हणजे नक्की काय असा प्रश्न तर पडलाच ्सेल ना. लिंबाचे नाव जरी काढले आपल्या तोंडाला पाणी सुटते. पण हा तो लिंबू नाहीये. तर हा कच्चा लिंबु आहे दिल चाहता है गर्ल सोनाली कुलकर्णीचा. होय सोनाली कुलकर्णीचा नवीन मराठी चित्रपट कच्चा लिंबु लवकरच तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओक यांच्या दिग्दर्शनाने हा कच्चा लिंबु किती प्रेक्षकांच्या पचनी पडतोय ते आपल्याला काही दिवसांतच समजेल पण तो पर्यंत आपण या कच्चा लिंबुंचा सेल्फी पाहुयात. नूकताच या चित्रपटाच्या टिमने मस्त पैकि एक सेल्फी काढला आहे. या सेल्फीमध्ये बरेच कलाकार असुन सर्वजणच एकदम हॅपी मुडमध्ये दिसत आहेत. चला तर मग आपणही त्यांच्या आनंदात सहभागी होऊन या संपुर्ण टिमला त्यांच्या कच्चा लिंबुसाठी शुभेच्छा देऊयात.