रवी जाधव करणार अभिनयात डेब्यू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 11:31 IST2016-04-01T18:31:39+5:302016-04-01T11:31:39+5:30

२०१६ हे वर्ष नव्या चित्रपटांसाठी खुप महत्त्वाचे ठरत आहे. कारण अनेक मराठी चित्रपटांची घोषणा सातत्याने होते  आहे. त्यापैकी एक ...

Ravi Jadhav to Abhinayu Debut! | रवी जाधव करणार अभिनयात डेब्यू !

रवी जाधव करणार अभिनयात डेब्यू !

१६ हे वर्ष नव्या चित्रपटांसाठी खुप महत्त्वाचे ठरत आहे. कारण अनेक मराठी चित्रपटांची घोषणा सातत्याने होते  आहे. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’.

प्रसाद ओकला चित्रपट दिग्दर्शनाचे उत्तम कौशल्य अंगभूत असून त्याने याअगोदर ‘हाय काय नाय काय’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तसेच त्याने ‘होणार सून मी या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

मंदार देवस्थळी हे ‘कच्चा लिंबू’ चित्रपटाचे निर्माते आहेत. यात  तसेच सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवी जाधव आणि अनंत महादेवन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

निर्माता, दिग्दर्शक बनल्यानंतर रवी जाधव यांनी ‘कच्चा लिंबू’ मधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. ते म्हणाले,‘ मंदार देवस्थळी आणि प्रसाद ओक  यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने मी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 

prasad oak

Web Title: Ravi Jadhav to Abhinayu Debut!