लॉकडाऊनमध्ये ही मराठी अभिनेत्री होतेय दिवसेंदिवस बोल्ड, पुन्हा शेअर केला हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 14:16 IST2020-04-17T14:13:39+5:302020-04-17T14:16:54+5:30

'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती.

Rasika sunil share her hot photo on insta during lockdown gda | लॉकडाऊनमध्ये ही मराठी अभिनेत्री होतेय दिवसेंदिवस बोल्ड, पुन्हा शेअर केला हॉट फोटो

लॉकडाऊनमध्ये ही मराठी अभिनेत्री होतेय दिवसेंदिवस बोल्ड, पुन्हा शेअर केला हॉट फोटो

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.  रसिका सुनीलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्पोर्टी लूकमधला हॉट फोटो शेअर केला आहे.या फोटोत ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसते आहे. या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

रसिका सुनील बद्दल बोलायचे झाले तर छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.

तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली.अमेरिकेत रसिका शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते.

Web Title: Rasika sunil share her hot photo on insta during lockdown gda