रसिका सुनिलचा 'हा' फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 08:00 IST2019-03-31T08:00:00+5:302019-03-31T08:00:00+5:30

सध्या तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड असाच एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हा फोटो खूप ग्लॅमरस असाच म्हणावा लागेल.

Rasika Sunil Glamorous Photo Viral On Social Media | रसिका सुनिलचा 'हा' फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

रसिका सुनिलचा 'हा' फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी  रसिका सुनिल सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. सध्या तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड असाच एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हा फोटो खूप ग्लॅमरस असाच म्हणावा लागेल. मोकळे सोडलेले केस, ब्लॅक रंगातील ड्रेसमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.  रसिकाचे दर्शन पुन्हा एकदा कधी घडणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

त्यामुळे हा फोटो पाहून ती पुन्हा एकदा सिनेमा किंवा मालिकेच्या माध्यमातून झळकणार का? असेच प्रश्न सध्या चाहते तिला विचारताना दिसतायेत. सध्या तरी रसिकाने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर कोणतेच उत्तर दिले नसले तरी ती अमेरिकेत आहे. शनाया फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कमध्ये आहे. तुर्तास रसिकाचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. 

रसिका छोट्या पडद्यावर झळकत नसली तरीही तिचे चाहते तिला विसरलेले नाहीत. म्हणून एका युजरने थेट तिला तिच्या रिलेनशिप स्टेटसबद्दल प्रश्न विचारला. इतरांप्रमाणे रसिकाने उत्तर देणे टाळले नसून त्यावर तिने सांगितले की, ‘मी सुपर सिंगल’ आहे. तिचे हे उत्तर वाचून अनेकांना आशेचा किरण दिसला असणार हे मात्र नक्की. 

Web Title: Rasika Sunil Glamorous Photo Viral On Social Media