रसिका आणि आदितीचा दोस्ताना, 'यू अॅण्ड मी' या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आल्या एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:00 IST2018-08-25T09:50:15+5:302018-08-27T06:00:00+5:30

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया आणि ईशा या दोघींचा 'यू अँड मी' हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रेक्षक भेटीस येत असून व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.

Rasika Sunil and Aditi's new album You And Me | रसिका आणि आदितीचा दोस्ताना, 'यू अॅण्ड मी' या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आल्या एकत्र

रसिका आणि आदितीचा दोस्ताना, 'यू अॅण्ड मी' या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आल्या एकत्र

ठळक मुद्देशनाया आणि ईशाचा 'यू अँड मी' अल्बमरसिका व अदितीने केले बारा ड्रेस परिधानआदिती द्रविडने 'यू अँड मी'ला दिला स्वरसाज


आपल्या हटके अंदाजात कटकारस्थाने करत धमाल उडवून देणाऱ्या 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशिया करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. फक्त आता त्यांचा हा दोस्ताना येऊ घातलेल्या 'यू अँड मी' या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आहे.

 'जरा सा कट्टा टाकू आता... जरासी बाते तेढीमेढी..., थोडासा किस्सा करू आता...  थोडीशी यादे तेरी मेरी..., करू आम्ही मनमानिया... ऐसी है अपनी यारीया...'  असे म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड, आपला दोस्ताना या अल्बमच्या माध्यमातून दाखवणार आहेत. या दोघींचा 'यू अँड मी' हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रेक्षक भेटीस येत असून व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.
'यू अँड मी' या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणे लिहिले असून आदिती आणि रसिकानेच हे गाणे गायले आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत. अभिनयातल्या रंगानंतर रसिका आणि आदितीच्या संगीताचे सूर ही प्रेक्षक पसंतीस उतरतील अशी आशा आहे.

Web Title: Rasika Sunil and Aditi's new album You And Me