शूटिंग दरम्यान राकेश बापटला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 04:02 IST2016-03-18T11:02:38+5:302016-03-18T04:02:38+5:30
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टंट तसेच फाईट सीन करताना नायकांना दुखापत होत असते. हिंदी चित्रपटात हे नेहमी घडत असते. त्या ...

शूटिंग दरम्यान राकेश बापटला दुखापत
च त्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टंट तसेच फाईट सीन करताना नायकांना दुखापत होत असते. हिंदी चित्रपटात हे नेहमी घडत असते. त्या तुलनेने मराठी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असे अपघात क्वचितच घडतात.
अशाीच एक घटना ‘वृंदावन’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडली. राकेश बापट अॅक्शन सीन करीत असताना पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र कामाच्या गडबडीत राकेशला दुखापत झाल्याचे कळलेच नव्हते. तब्बल ४० मिनीटाच्या या फाईट सीननंतर राकेशला दुखापत झाल्याचे कळले. सिनेमाची शूटिंग थांबवून तात्काळ राकेशला दवाखान्यात दाखल करण्यात आले. सुदैवाने दुखापत अधिक खोलवर नसल्याने डॉक्टरांनी राकेशला काम सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.