​रोहन गुजरचे इन्स्टाग्राम पेज झाले व्हेरिफाइड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 16:51 IST2017-09-15T11:21:38+5:302017-09-15T16:51:38+5:30

होणार सून मी या घरची या मालिकेतील पिंट्या या भूमिकेमुळे रोहन गुजरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेने त्याला प्रेक्षकांच्या ...

Raghun Gujar's Instagram page was verified | ​रोहन गुजरचे इन्स्टाग्राम पेज झाले व्हेरिफाइड

​रोहन गुजरचे इन्स्टाग्राम पेज झाले व्हेरिफाइड

णार सून मी या घरची या मालिकेतील पिंट्या या भूमिकेमुळे रोहन गुजरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेने त्याला प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले. आज ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी पिंट्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. या मालिकेनंतर बन मस्का या मालिकेत देखील त्याने काम केले होते. त्याच्या या मालिकेतील भूमिकेला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. रोहनने काही दिवसांपूर्वी अॅक्टिव्ह पॅसिव्ह या लघुपटात देखील काम केले होते. या लघुपटाची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच त्याने वर खाली दोन पाय या नाटकात देखील काम केले होते. या नाटकातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. गेल्या काही वर्षांत रोहनने छोट्या पडद्यावर त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.
रोहनने काहीच महिन्यांपूर्वी त्याची मैत्रीण स्नेहल देशमुखसोबत साखरपुडा केला. स्नेहल आणि रोहन यांची मैत्री गेल्या १४ वर्षांपासूनची आहे. रोहनच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या या नव्या बदलामुळे तो सध्या चांगलाच खूश आहे. पण तो सध्या आनंदित असल्याचे आणखी एक कारण आहे. रोहनचे इन्स्टाग्राम पेज नुकतेच व्हेरिफाइड झाले असून त्याचा त्याला चांगलाच आनंद झाला आहे. रोहनने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईडवरून त्याचा हा आनंद व्यक्त केला आहे. त्याने अकाऊंट व्हेरिफाईड झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरचे माझे अकाऊंट व्हेरिफाईड झाल्याबद्दल मी खूप खूश आहे. माझ्या नावाच्या पुढे ही ब्ल्यू टीक पाहून मला खूप आनंद झाला आहे असे म्हटले आहे. त्याचसोबत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा फोटो देखील टाकला आहे. 
रोहनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर २६ हजाराहून अधिक फोलोव्हर्स आहेत. रोहन नेहमीच इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो. तो नेहमीच सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याचे फॅन देखील सोशल नेटवर्किंग साईटवर त्याला नेहमीच फॉलो करतात. रोहनने साखरपुडा झाल्यानंतर देखील ही बातमी त्याच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम या अकाऊंटवरूनच दिली होती. 

Also Read : होणार सून मी या घरची फेम ​रोहन गुजरचा झाला साखरपुडा

Web Title: Raghun Gujar's Instagram page was verified