पुष्कर करणार घाटी ट्रान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 11:49 IST2016-05-13T06:19:18+5:302016-05-13T11:49:18+5:30

           पुष्कर जोग हा अभिनेता आहेच परंतू तो उत्तम डान्सर आहे हे देखील आपल्याला माहित ...

Pushkar will do the trash in the valley | पुष्कर करणार घाटी ट्रान्स

पुष्कर करणार घाटी ट्रान्स


/>           पुष्कर जोग हा अभिनेता आहेच परंतू तो उत्तम डान्सर आहे हे देखील आपल्याला माहित आहे. पुष्करने त्याच्या अनेक सिनेमांमध्ये ठुमके लगावीत त्याच्या डान्सची झलक तर आपल्याला दाखविलीच आहे. आता पुष्कर सज्ज झाला आहे एका म्युझिक व्हीडीओसाठी. नूकतेच त्याने सोशल साईट्सवर त्याच्या घाटी ट्रान्स या म्युझिक व्हीडीओ संदर्भात काही गोष्टी शेअर केल्या आहेत. नावावरुनच आपल्याला काहीतरी नक्कीच इंटरेस्टींग पहायला मिळणार असे वाटत आहे. पुष्कर आता घाटी ट्रान्स या म्युझिक व्हिडीयोमध्ये युके मॉडेल अ‍ॅशली एमा सोबत थिरकताना दिसणार आहे.  या गाण्याविषयी तर चर्चा नक्कीच होणार पण पुष्करने यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी त्याच्या कोरिग्राफर अँडीने त्याचे कौतुक केले. पुष्कर जोग विषयी रेमो डिसूझाचा असिसटंट अँडी सांगतो,जेव्हा पहिल्यांदा मी पुष्करला भेटलो तेव्हाच मला कळलं की हे शूट चांगलं होणार आहे.  या गाण्याविशयी तो अतिशय उत्साही होता.  पुष्कर सारखा तल्लख, हुशार अभिनेता आणि नॅचरल डान्स टॅलेंट कलाकार शोधणं अगदी दुर्मिळ आहे. घाटी ट्रान्स या गाण्याचे दिग्दर्शन सचिन गुप्ता यांनी केले आहे तर जसप्रीत जॅझ आणि सोनू कक्कर यांनी हे गाणं गायलं आहे आणि या गाण्यावर रेमो डिसूझाचा असिसटंट अँडीने डान्स कोरिओग्राफी केला आहे. युके मधील हॉट आणि बोल्ड मॉडेल म्हणून अ‍ॅशली एमाची ओळख आहे. युके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॅबलॉईड आणि मासिकांसाठी तिने फोटोशूट केले आहे. आता या व्हीडीओमध्ये हे दोघे काय कमाल करतात ते पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

                            

Web Title: Pushkar will do the trash in the valley