'९ महिन्यांची प्रेग्नंट असताना फास्ट ट्रेनमधून ढकललं'; मंजिरी ओकला आला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:06 AM2024-02-01T11:06:54+5:302024-02-01T11:12:55+5:30

Manjiri oak: मंंजिरी २३ वर्ष हाऊस वाइफ होती. परंतु, त्यापूर्वी ती नोकरी करायची. मात्र, प्रवासादरम्यान आलेल्या भीतीदायक अनुभवानंतर तिने नोकरी करणं सोडून दिलं.

Pushed from fast train when 9 months pregnant Manjiri Oak recounts the harrowing experience | '९ महिन्यांची प्रेग्नंट असताना फास्ट ट्रेनमधून ढकललं'; मंजिरी ओकला आला भयानक अनुभव

'९ महिन्यांची प्रेग्नंट असताना फास्ट ट्रेनमधून ढकललं'; मंजिरी ओकला आला भयानक अनुभव

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि आदर्श जोडी म्हणजे प्रसाद ओक (prasad oak) आणि मंजिरी ओक (manjiri oak). प्रसादच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये मंजिरीचा मोठा वाटा आहे. मंजिरीने प्रत्येक पावलावर प्रसादची साथ दिली आहे. विशेष म्हणजे आज ती स्वत: कलाविश्वात तिचं स्थान भक्कम करत आहे. मंजिरी जवळपास २३ वर्ष हाऊस वाईफ म्हणून घर सांभाळत होती. मात्र, त्यापूर्वी ती मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करत होती. मात्र, ही नोकरी करत असताना तिला मुंबई लोकल प्रवासात जबरदस्त भितीदायक अनुभव आला. त्यानंतर तिने नोकरी सोडून घर सांभाळण्याचा निर्णय घेतला.

अलिकडेच मंजिरीने  असोवा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी विरार लोकलने प्रवास करत असताना गर्दीमधून तिला ढकलण्यात आल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे ९ महिन्यांची प्रेग्नंट असताना तिच्यासोबत हा किस्सा घडला. ज्यामुळे तिच्या मनात भीती बसली. 

नेमकं काय घडलं मंजिरीसोबत?

"हाऊस वाईफ असणं हा खूप मोठा टास्क आहे. मी २३ वर्ष पूर्णपणे हाऊस वाईफ होते. नोकरी २ वर्ष मी नोकरी केली. २ वर्षानंतर माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता आणि मी ९ महिन्यांची प्रेग्नंट होते. मी जॉबवरुन निघाले आणि मला विरार फास्ट ट्रेनमधून एकदम ढकलून दिलं. आणि, त्यावेळी माझे ९ महिने पूर्ण झाले होते म्हणजे कधीही माझी डिलिव्हरी होईल असं होतं. त्यावेळी मी प्लॅटफॉर्मवर पडले. पोटावर नाही पडले पण पडले आणि मी खूप घाबरले", असं मंजिरी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी त्यावेळी मार्केटिंगचा जॉब करायचे आणि त्यामुळे फिरावं लागायचं सतत. मी २ वर्ष मी फिरत असल्यामुळे मला ट्रेनचा प्रॉब्लेम नव्हता. पण, अचानक हे काय झालं याची मला भीती मनात बसल्यामुळे मग.. संध्याकाळी प्रसाद घरी आला आणि म्हणाला, आता बस्स..आता तू घरी रहा. तोपर्यंत दुरदर्शनवरच्या त्याच्या काही मालिका सुरु झाल्या होत्या. तेव्हा चॅनेल्स आले नव्हते. पण, दुरदर्शनवर दामिनी, बंदिनी या मालिका सुरु झाल्या होत्या. त्यामुळे बरं इन्कम येत होतं. आमचं भागेल एवढं येत होतं. म्हणून मग मी नोकरी सोडली आणि घरी  राहिले."

Web Title: Pushed from fast train when 9 months pregnant Manjiri Oak recounts the harrowing experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.