प्रिया बापट साकारणार पौर्णिमा गायकवाड,नागेश कुकूनुरच्या मायानगरीत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:40 IST2018-05-11T07:25:00+5:302018-05-11T14:40:05+5:30

मराठीसह हिंदी सिनेमा,मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.आपल्या अभिनयाने ही ...

Purnima Gaikwad, Nagesh Kukunur to be seen in Priyapala | प्रिया बापट साकारणार पौर्णिमा गायकवाड,नागेश कुकूनुरच्या मायानगरीत झळकणार

प्रिया बापट साकारणार पौर्णिमा गायकवाड,नागेश कुकूनुरच्या मायानगरीत झळकणार

ाठीसह हिंदी सिनेमा,मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.आपल्या अभिनयाने ही तिन्ही माध्यमं प्रियाने गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.प्रिया आता पुन्हा एकदा हटके आणि तितक्याच आव्हात्मक भूमिकेसह रसिकांच्या भेटीला येत आहे.'मायानगरी' सिटी ऑफ ड्रीम्स असं या सिनेमाचं नाव आहे. समीर नायर यांच्या अप्लॉज एंटरटेन्मेंटने या सिनेमाची निर्मिती केली असून प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकूनुर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.या सिनेमात प्रिया पौर्णिमा गायकवाड या महत्त्वाकांक्षी,बाणेदार आणि कणखर अशा मुलीची व्यक्तीरेखा साकारणार आहे.स्वतः प्रियाने या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे.यांत प्रियाचा कणखर अंदाज पाहायला मिळतो आहे. मुलींच्या इच्छा आकांक्षांना कायम कमी लेखलं जातं, मात्र त्या कुणापेक्षाही कमी नसतात असं प्रियाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मायानगरी हा एक राजकीय ड्रामा असून सत्तेसाठीची स्पर्धा यांत पाहायला मिळेल. सिनेमाचं पोस्टर पाहता प्रियाच्या पौर्णिमा गायकवाडबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर तिचा हा अंदाज रसिकांना भावतो आहे.हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.'काकस्पर्श' सिनेमातील उमा, 'वजनदार' सिनेमातील पूजा, 'आम्ही दोघी'मधील सावी रसिकांना भावली.शिवाय 'मुन्नाभाई एमबीबीबीएस','लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमातही ती झळकली.आता पौर्णिमा गायकवाड रसिकांना भावणार का हे लवकरच स्पष्ट होईल.



प्रिया सध्या तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रचंड व्यग्र आहे.पण असे असले तरी एका गोष्टीला ती खूप मिस करत आहे.प्रिया चित्रीकरणात व्यग्र असल्याने उमेशला मिस करत असेल असेच तुम्हाला वाटत असेल. पण असे नाहीये.प्रिया उमेशला नव्हे तर तिच्या जुन्या हेअर स्टाईलला मिस करत आहे. प्रिया तिच्या हेअर स्टाईलला मिस करत असल्याचे तिनेच सोशल मीडियावर म्हटले आहे.तिने तिचा एक जुना फोटो शेअर करून डिअर शॉर्ट हेअर, मला तुझी आठवण येतेय असे तिने म्हटले आहे. 

Web Title: Purnima Gaikwad, Nagesh Kukunur to be seen in Priyapala