बापमाणूस झालो रे! मराठमोळ्या रॅपरला कन्यारत्न, मुलीच्या जन्माने आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:42 IST2025-12-28T09:41:50+5:302025-12-28T09:42:21+5:30
मराठी कलाविश्वातून एक गुडन्यूज आली आहे. मराठमोळा रॅपरच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे.

बापमाणूस झालो रे! मराठमोळ्या रॅपरला कन्यारत्न, मुलीच्या जन्माने आनंद गगनात मावेना
मराठी कलाविश्वातून एक गुडन्यूज आली आहे. मराठमोळा रॅपरच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. पुणे रॅप फेम रॅपर श्रेयस जाधवच्या घरी पाळणा हलला आहे. श्रेयसच्या पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कन्यारत्न झाल्याने श्रेयसच्या घरी आनंदाचं वातावरण आहे.
श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन त्याच्या पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. मॅटर्निटी फोटोशूटचा हा व्हिडीओ आहे. मुलगी झाल्याची गुडन्यूज हा व्हिडीओ शेअर करत त्याने दिली आहे. "बापमाणूस झालो रे", असं म्हणत श्रेयसने आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत श्रेयस आणि त्याच्या पत्नीचं अभिनंदन केलं आहे.
पुणे रॅपमुळे श्रेयस जाधव प्रसिद्धीझोतात आला होता. त्याचं हे रॅप साँग प्रचंड व्हायरल झालं होतं. रॅपर असण्यासोबतच तो एक दिग्दर्शक, लेखक आणि निर्माताही आहे. काही मराठी सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याने केलं आहे. २०१९ मध्ये श्रेयसने भाग्यश्री श्रेयवंशी हिच्यासोबत लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत.