प्रियांका झाली अनारकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 18:16 IST2016-10-22T18:16:02+5:302016-10-22T18:16:02+5:30

              सलीम अनारकलीची प्रेमकथा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. बॉलिवूडमध्ये देखील या प्रेमकथेला ...

Priyanka got Anarkali | प्रियांका झाली अनारकली

प्रियांका झाली अनारकली

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
 
          सलीम अनारकलीची प्रेमकथा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. बॉलिवूडमध्ये देखील या प्रेमकथेला मोठ्या पडदयावर दिलीप कुमार आणि मधुबाल यांच्या जोडीने रंगविले होते. आता मराठीमध्ये देखील एक सुंदर अनारकली प्रेक्षकांना लवकरच दिसणार आहे. गायिका प्रियांका बर्वे प्रेक्षकांना अनारकलीच्या रुपात पाहायला मिळणार आहे. परंतु प्रियांका मालिका किंवा चित्रपटात तुम्हाला अनारकलीच्या वेशात दिसणार नाही. तर ती एका म्युझिकल प्लेमध्ये अनारकली झाली आहे. नुकतेच प्रियांकाने सोशल मीडियावर या बातमीचा खुलासा केला. प्रियांका सांगते, ''मी लवकरच अनारकलीची भूमिका मुघल-ए-आझम या संगीत नाटकात ती करणार आहे. या संगीत नाटकाचे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान यांनी केले आहे. तर कोरिओग्राफी मयुरी उपाध्याय यांची असणार आहे. अहो एवढेच नाही तर या अनारकलीच्या भूमिकेसाठी प्रियांकाचा ड्रेस डिझाईन केला आहे बॉलिवूडचा अघाडीचा ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्राने. प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते की आपण एकदातरी मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला ड्रेस घालावा. आता प्रियांकाचे हे स्वप्न या संगीत नाटकामुळे पूर्ण झाले आहे. प्रियांकाने या भूमिकेसाठी तिला ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचेच आभार मानले आहेत. प्रियांका मराठी चित्रपटसृष्टीत एक आघाडीची गायिका म्हणून ओळखली जात होती. तिने नुकताच एक म्युझिक अल्बम देखील केला होता. तर काही दिवसांपुर्वीच तिने फोटोशूटही केले होते. त्यामुळे काही दिवसात प्रियांका आपल्याला चित्रपटात अभिनय करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आता लवकरच प्रेक्षकांना अनारकलीच्या रुपातील सुंदर प्रियांका मुघल-ए-आझम मध्ये पाहायला मिळणार आहे.

 





Web Title: Priyanka got Anarkali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.