गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलला पाळणा, बाळासोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्युज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 15:42 IST2020-09-01T15:33:30+5:302020-09-01T15:42:58+5:30

प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

Priyanka barve blessed with a baby boy | गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलला पाळणा, बाळासोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्युज

गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलला पाळणा, बाळासोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्युज

 प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेने 8 ऑगस्ट 2020 ला गोंडस बाळाला जन्म दिला आहे. प्रियंकाला मुलगा झाला आहे. प्रियंका चाहत्यांसोबत सोशल मीडियावर ही गुड बातमी शेअर केली. प्रियंका आणि सारंगने बाळासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बाळाचं नाव प्रियंकाने युवान ठेवले आहे. प्रियंकाच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केलीय आहे. फोटोमध्ये प्रियंकाच्या चेहऱ्यावर आई झाल्याचा आनंद स्पष्ट दिसतो आहे. पहिल्या बाळाच्या  आगमनाची  वाट प्रियंका आणि सारंग मोठ्या आतुरतेने पहात होते. 

लग्नानंतर प्रियंका खाजगी आयुष्यात रमली. पती सारंग कुलकर्णीसह ती नेहमीच क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसली. दोघांमध्ये खूप घट्ट केमिस्ट्री आहे. याआधी प्रियंकाने बेबी बंम्पचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.  

प्रियंकाने मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील पार्श्वगायन केले आहे. ‘काळोखाच्या वाटेवरती उजेडा रुसला बाई’ याच्या पार्श्वगायनासाठी तिला राज्य पुरस्कार मिळाला.‘आनंदी गोपाळ’, ‘रमा माधव’, ‘लॉस्ट अँड फाऊंड’, ‘डबल सीट’ या चित्रपटांसाठीही तिने गायन केलं आहे. 

Web Title: Priyanka barve blessed with a baby boy