प्रियदर्शन जाधव बनणार दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2017 05:41 AM2017-02-25T05:41:22+5:302017-02-25T11:15:27+5:30

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकार दिग्दर्शक बनण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, ऋषिकेश जोशी यांच्यापाठोपाठ आता ...

Priyadarshan Jadhav becomes the director | प्रियदर्शन जाधव बनणार दिग्दर्शक

प्रियदर्शन जाधव बनणार दिग्दर्शक

googlenewsNext
्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकार दिग्दर्शक बनण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, ऋषिकेश जोशी यांच्यापाठोपाठ आता प्रेक्षकांचा लाडका अभिनेता प्रियदर्शन जाधवदेखील दिग्दर्शक बनण्यास सज्ज झाला असल्याचे कळत आहे. त्याचा लवकरच एक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मस्का असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरे, चिन्मय मांडलेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारी ते जुलै या महिन्यात पूर्ण झाले. आता याचवर्षी मस्का हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट मुंबईतील काही घटनांवर भाष्य करणारा असणार आहे. प्रशांत पाटील या चित्रपटाचे निमार्ते असून, त्यांचा हा सिनेमा निर्मितीचा पहिलाच चित्रपट आहे. त्याचबरोबर या चित्रपटात प्रेक्षकांना शशांक शेंडे, प्रणव रावराणे या कलाकारांचादेखील समावेश असणार आहे. चला तर पाहुयात प्रियदर्शन जाधव त्याच्या अभिनयाप्रमाणेच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का?
       
       प्रियदर्शनने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याने चित्रपटसृष्टीला टाईमपास २, धिंगाणा, हलाल अशा अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविताना दिसला. तसेच तो नुकताच चला हवा येऊ दया या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेतदेखील पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर त्याचा सायकल हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. त्यामुळे तो दिग्दर्शन आणि अभिनेत अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणार आहे. म्हणूनच  यंदा प्रियदर्शनची गाडी सुसाट निघणार असल्याचे दिसत आहे. 

Web Title: Priyadarshan Jadhav becomes the director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.