प्रिया मराठेचा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, अस्सल मराठमोळ्या राणीसाहेब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 16:10 IST2020-01-29T16:03:12+5:302020-01-29T16:10:58+5:30

प्रिया मराठेचा पती 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतो आहे.

Priya marathe looks beautiful in saree | प्रिया मराठेचा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, अस्सल मराठमोळ्या राणीसाहेब

प्रिया मराठेचा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, अस्सल मराठमोळ्या राणीसाहेब

अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीट तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच प्रियाने मराठमोळ्या अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत प्रिया नऊवारी साडीत दिसते. 'मराठमोळा अंदाज' असे कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. साडीत प्रियाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. प्रियाचा हा फोटो तिच्या फॅन्सना आवडला आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी ती दर्शवली आहे.

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं.

तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.

Web Title: Priya marathe looks beautiful in saree