प्रिया मराठे पुन्हा वळली रंगभूमीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:30 IST2019-05-26T06:30:00+5:302019-05-26T06:30:00+5:30

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे.

Priya Marathe again turns to theater | प्रिया मराठे पुन्हा वळली रंगभूमीकडे

प्रिया मराठे पुन्हा वळली रंगभूमीकडे

ठळक मुद्देप्रिया मराठे पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळली आहे

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया मराठे पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रिया पुन्हा नाटकात काम करणार आहे. हे कोणतं नाटकं आहे, यात प्रिया कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

प्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीट फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीट तिचे फोटो शेअर करत असते. प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं.तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली.गेल्या वर्षी तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.

Web Title: Priya Marathe again turns to theater