प्रिया बेर्डेंचं रंगभूमीवर पुनरागमन, ‘भुल भुलैय्या’ नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाल्या- "बऱ्याच वर्षांनी पुन्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:56 IST2026-04-06T16:55:30+5:302026-04-06T16:56:00+5:30

भ्रम आणि वास्तव यांच्या गुंतागुंतीचा असाच रंगतदार खेळ ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे लवकरच  मराठी रंगभूमीवर रंगणार आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘भुल भुलैय्या’ मधून रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन करत आहेत.

priya berde to play important role in bhul bhulaiyy natak shared her views | प्रिया बेर्डेंचं रंगभूमीवर पुनरागमन, ‘भुल भुलैय्या’ नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाल्या- "बऱ्याच वर्षांनी पुन्हा..."

प्रिया बेर्डेंचं रंगभूमीवर पुनरागमन, ‘भुल भुलैय्या’ नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाल्या- "बऱ्याच वर्षांनी पुन्हा..."

‘भुल भुलैय्या’ म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणांनी भरलेला प्रवास आणि प्रत्येक क्षणी चकित करणारा थरारक अनुभव. जिथे सत्य आणि भास यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर होते की काय खरं? आणि काय खोटं? हे ओळखणंच कठीण होतं. भ्रम आणि वास्तव यांच्या गुंतागुंतीचा असाच रंगतदार खेळ ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे लवकरच  मराठी रंगभूमीवर  रंगणार असून या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार १९ एप्रिलला दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, येथे संपन्न होणार आहे.

रंगत संगत आणि श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स निर्मित भुल भुलैय्या नाटकाची कथा हेमंत एदलाबादकर यांची असून रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश कुमार सोहोनी यांचे आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘भुल भुलैय्या’ मधून रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन करत आहेत. ‘भुल भुलैय्या’च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या की, "जरी बऱ्याच वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. ‘भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे".

प्रिया बेर्डे यांच्यासोबत साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी  हे कलाकार नाटकात आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग  रवि १९ एप्रिल दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, सोम २० एप्रिल रात्रौ ८.०० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे  मंगळ २१एप्रिल दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे  रंगणार आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे  तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. सूत्रधार-विजय सूर्यवंशी आहेत.

Web Title : प्रिया बेर्डे ने 'भूल भुलैया' के साथ मंच पर वापसी की, सालों बाद।

Web Summary : प्रिया बेर्डे 'भूल भुलैया' के साथ वापसी कर रही हैं, जो सत्य और भ्रम के बारे में एक रहस्यपूर्ण नाटक है। प्रदर्शन 19 अप्रैल से रवींद्र नाट्य मंदिर में शुरू होंगे।

Web Title : Priya Berde returns to stage with 'Bhul Bhulaiyaa' after years.

Web Summary : Priya Berde makes a comeback with 'Bhul Bhulaiyaa,' a suspenseful play about truth and illusion. Performances begin April 19th at Ravindra Natya Mandir.