प्रिया बापट नो-मेकअप लूकमध्ये ही दिसते तितकीच सुंदर, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 13:22 IST2020-04-28T13:12:53+5:302020-04-28T13:22:09+5:30

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Priya Bapat's no-makeup looks viral on social media gda | प्रिया बापट नो-मेकअप लूकमध्ये ही दिसते तितकीच सुंदर, फोटो होतोय व्हायरल

प्रिया बापट नो-मेकअप लूकमध्ये ही दिसते तितकीच सुंदर, फोटो होतोय व्हायरल

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.


सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. 


प्रियाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा नो- मूकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. प्रियाच्या या फोटोवरुन ती नुकतेच वर्कआऊट करून आल्याचे समजतेय.  यात प्रियाच्या चेहऱ्यावर हास्य दिसतेय. प्रियाच्या फॅन्सना नो- मेकअप लूकमधील तिचा फोटो आवडला आहे.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

Web Title: Priya Bapat's no-makeup looks viral on social media gda