फिट आणि तंदुरुस्त प्रिया बापटचा अंदाज तुम्हालाही करेल फिदा, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा…

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 08:00 AM2019-02-04T08:00:00+5:302019-02-04T08:00:00+5:30

प्रियाचा फिट अवतार पाहून फॅन्सही फिदा झाले आहेत. आपल्या सहकलाकारांसोबतचे फोटोही ती इथे शेअर करते. त्यामुळंच तिच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या १ लाखावर पोहोचली आहे.

Priya Bapat’s Fit & helathy look you will like, shares photo on Instagram | फिट आणि तंदुरुस्त प्रिया बापटचा अंदाज तुम्हालाही करेल फिदा, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा…

फिट आणि तंदुरुस्त प्रिया बापटचा अंदाज तुम्हालाही करेल फिदा, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा…

googlenewsNext

आगामी वर्षात अधिकाधिक फिट आणि तंदुरुस्त राहण्याचा संकल्प मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने केला आहे. त्यामुळंच की काय नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रिया आपल्या फिटनेसवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करत आहे.बराच वेळ ती जिममध्ये घाम गाळते. आपल्या या फिटनेस प्रेमाचं फॅन्सनीसुद्धा अनुकरण करावं यासाठी ती तिचे जिममध्ये ट्रेनिंग करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मग ते साधा व्यायाम असो किंवा एखादं कठीण व्यायामाचं टास्क, हे सगळे फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. प्रियाचा फिट अवतार पाहून फॅन्सही फिदा झाले आहेत. आपल्या सहकलाकारांसोबतचे फोटोही ती इथे शेअर करते. त्यामुळंच तिच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या १ लाखावर पोहोचली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये प्रियाला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे तिला काम अर्धवट सोडावं लागलं होतं. हे पुन्हा होऊ नये यासाठी प्रियाने या वर्षात फिट राहण्याचा संकल्प केला आहे. 

मराठीसह हिंदी सिनेमा, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या प्रियाने अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या अभिनयाने तिने तिन्ही माध्यमं गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.  लवकरच प्रिया पती उमेश कामतसह रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. प्रिया सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह आहे. खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. आपल्या फॅन्ससह संवाद साधता साधता ती त्यांच्यासह फोटो, आगामी सिनेमाचे अपडेट्सही देत असते.


 

Web Title: Priya Bapat’s Fit & helathy look you will like, shares photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.