दादरच्या चाळीत गेलंय प्रिया बापटचं बालपण, पाहा तिच्या या घराचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:48 IST2023-05-29T13:47:36+5:302023-05-29T13:48:47+5:30

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या नव्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिची 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Priya Bapat's childhood passed in Dadar's chali, watch the video of her house | दादरच्या चाळीत गेलंय प्रिया बापटचं बालपण, पाहा तिच्या या घराचा व्हिडीओ

दादरच्या चाळीत गेलंय प्रिया बापटचं बालपण, पाहा तिच्या या घराचा व्हिडीओ

छोटा पडदा ते रुपेरी पडद्यावर आपली अभिनयातील कारकीर्द सुरू करणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या तिच्या नव्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिची 'सिटी ऑफ ड्रीम्स'(City Of Dreams 3)चा तिसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या सीरिजची चर्चा ऐकायला मिळते आहे. या सीझनच्या यशासाठी नुकतेच प्रिया बापट हिने संपूर्ण टीमसोबत दादर येथीस सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. मात्र दादर आणि प्रियाचे जुने नाते आहे. कारण प्रियाचं बालपण दादरमध्येच गेले आहे. त्यामुळे सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन प्रिया आधी तिच्या दादरमधल्या घरी गेली. तिने एक व्हिडिओ शेअर करत तिचे घर दाखवले आहे. त्यात दादरमधल्या चाळीतील तिचे घर पाहायला मिळत आहे.

प्रिया बापटने व्हिडिओच्या सुरुवातीला बाप्पाचे दर्शन घेतले. मग तिने आपल्या बालपणीच्या चाळीतल्या घराची झलक दाखवली. ती आधी व्हिडीओत जिने चढताना दिसते आहे. त्यानंतर तिने चाळीतल्या घरात गणपतीसाठी तिचे कुटुंबीय कुठे सजावट करायचे, ती जागा दाखवली. तसेच आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स तिने कुठे सादर केला होता, ते ठिकाण देखील ती या व्हिडिओत दाखवताना दिसत आहे. तिच्या चाळीतल्या घराची झलक दाखवताना ती लहानपणी अभ्यासाला कुठे बसायची, ती घरातील जागा देखील दाखवतेय. आपल्या घराच्या जिन्यावर प्रिया बागडताना दिसतेय. जणू प्रिया पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणीत रमली आहे.

घराची झलक दाखवल्यानंतर तिने थेट शिवाजी पार्क गाठले. या ठिकाणी पोहचल्यानंतर प्रिया सांगते की, शिवाजी पार्क आणि दादर म्हणजे माझे प्रेम. मग शेवटी प्रिया तिच्या आवडत्या आस्वाद उपाहारगृहाला भेट देतेय आणि ज्या शाळेने तिला घडवले ती बालमोहन शाळा देखील तिने दाखवली आहे. यावेळी ती म्हणते की, आज मी जे काही आहे त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या शाळेला जाते.' प्रिया बापटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

Web Title: Priya Bapat's childhood passed in Dadar's chali, watch the video of her house