प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:38 PM2018-10-27T16:38:13+5:302018-10-27T21:00:00+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत ही लोकप्रिय जोडी आहे.

Priya Bapat-Umesh Kamat will be seen again on screen | प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर

प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देउमेश कामत व प्रिया बापट चार वर्षांनी करणार एकत्र कामउमेश कामत व प्रिया बापट २०११ मध्ये अडकले दोघे विवाह बंधनात


अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. तसेच त्यांची रिल व रियल लाइफमधील केमेस्ट्री रसिकांना खूप भावते. त्या दोघांनी एकत्र केलेले सिनेमेदेखील प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे ही खऱ्या आयुष्यातले हे जोडीदार लवकरच ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहेत. ही माहिती खुद्द उमेश कामतने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिली आहे.

उमेश कामतने त्या दोघांना फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करून लिहिले की, “अखेर आम्ही चार वर्षांनी एकत्र काम करतोय.”


भलेही उमेश कामतने दोघे एकत्र काम करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले असले तरी अद्याप या चित्रपटाची कथा व शीर्षक समजू शकलेले नाही. 
प्रिया आणि उमेश या दोघांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करत आहेत. त्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच काम करता दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०११ मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले. नवा गडी नवं राज्य हे सुपरहिट नाटकांमधून प्रिया-उमेश या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यानंतर आलेला टाईप्लीज हा त्यांचा सिनेमासुध्दा प्रेक्षकांच्या पसंतीस  उतरला. त्यामुळे आता त्यानंतर चार वर्षांनी हे कपल एकत्र झळकते आहे. आता हे नाटक असेल सिनेमा की मालिका याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

Web Title: Priya Bapat-Umesh Kamat will be seen again on screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.