पती उमेश कामत नाही तर या अभिनेत्यासोबत प्रिया बापट दिसली ऑस्ट्रेलियामध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 11:44 IST2019-10-09T11:36:29+5:302019-10-09T11:44:08+5:30

प्रियाने टाइमपास, वजनदार, काकस्पर्श, आम्ही दोघी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात तिने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Priya bapat share her photo in sydney with amey wagh | पती उमेश कामत नाही तर या अभिनेत्यासोबत प्रिया बापट दिसली ऑस्ट्रेलियामध्ये!

पती उमेश कामत नाही तर या अभिनेत्यासोबत प्रिया बापट दिसली ऑस्ट्रेलियामध्ये!

प्रियाने टाइमपास, वजनदार, काकस्पर्श, आम्ही दोघी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात तिने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे.

आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते.प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.


सध्या प्रिया ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये आहे. तिने सिडनीमधील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तिच्या सोबत उमेश कामतनसून अमेय वाघ दिसतोय. एका कार्यक्रमासाठी प्रिया आणि अमेय ऑस्ट्रेलियात आले आहेत.     


प्रियाने चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. नवा गडी नवं राज्य या नाटकात तसेच अधुरी एक कहानी, शुभंकरोती, दे धमाल, आभाळमाया यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नागेश कुकुनूर यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत.

Web Title: Priya bapat share her photo in sydney with amey wagh