खल्लास! प्रिया बापटने बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट करत सगळ्यांचं केलं क्लीनबोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 16:36 IST2021-12-09T16:19:40+5:302021-12-09T16:36:39+5:30
सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अॅक्टिव्ह आहे.

खल्लास! प्रिया बापटने बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट करत सगळ्यांचं केलं क्लीनबोल्ड
उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.
सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.प्रियाने हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. प्रियाने काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. या फोटोमध्ये प्रिया वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. प्रियाचे या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्यात.
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.