प्रियाचा हा फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात, ही आहे फोटोची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 13:27 IST2020-01-01T13:23:08+5:302020-01-01T13:27:13+5:30

प्रियाने याआधी अनेक वेळा साडीतले फोटो शेअर केले आहेत.

Priya bapat looking stunning in saree | प्रियाचा हा फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात, ही आहे फोटोची खासियत

प्रियाचा हा फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात, ही आहे फोटोची खासियत

अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. प्रियाने काही दिवसांपूर्वी तिचा साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत लक्ष वेधून घेतेय ती प्रियाने नाकात घातलेली आधुनिक नथ. या नथीमुळे प्रियाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. प्रिया या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. तिच्या फॅन्सना देखील प्रियाचा ट्रेडिशनल लूक आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.


नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.


'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती. सध्या रसिकांच्या विशेष पंसतीस पडत असलेले 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या माध्यमातून उमेश कामतसोबत प्रियाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Web Title: Priya bapat looking stunning in saree