प्रिया बापटसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, जाणून घ्या त्यांच्यातील नात्याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 12:24 IST2020-02-05T12:15:15+5:302020-02-05T12:24:15+5:30

प्रियासोबत फोटोत दिसणारी ही छोटी मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Priya bapat her pic with neice shariva | प्रिया बापटसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, जाणून घ्या त्यांच्यातील नात्याबाबत

प्रिया बापटसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, जाणून घ्या त्यांच्यातील नात्याबाबत

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एका लहान मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. प्रियासोबत फोटोत दिसणारी ही छोटी मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. प्रियासोबत फोटो दिसणारी छोटी शरीवा तिच्या बहिणीची आहे. याचा खुलासा प्रियाने कॅप्शनमधून केला आहे. मावशी आणि तिची छोटी प्रिन्सेस असे कॅप्शन या फोटोला प्रियाने दिले आहे. प्रिया आणि शिवाराच्या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.   


'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.


या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती. सध्या रसिकांच्या विशेष पंसतीस पडत असलेले 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या माध्यमातून उमेश कामतसोबत प्रियाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Web Title: Priya bapat her pic with neice shariva