प्रिया बापटने दिलेल्या बोल्ड सीनचीच आहे सगळीकडे चर्चा, वाचा का म्हणतेय यावर प्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 11:41 IST2019-05-06T11:31:23+5:302019-05-06T11:41:35+5:30

सिटी ऑफ ड्रीम्स या बेवसिरिजमध्ये गीतिका त्यागीसोबत प्रियाचा बोल्ड सीन असून यावरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

priya bapat gets trolled due to lesbian scene in city of dreams | प्रिया बापटने दिलेल्या बोल्ड सीनचीच आहे सगळीकडे चर्चा, वाचा का म्हणतेय यावर प्रिया

प्रिया बापटने दिलेल्या बोल्ड सीनचीच आहे सगळीकडे चर्चा, वाचा का म्हणतेय यावर प्रिया

ठळक मुद्देसिटी ऑफ ड्रीम्स या बेवसिरिजमध्ये गीतिका त्यागीसोबत प्रियाचा बोल्ड सीन असून यावरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. याबद्दल तिने नुकतेच लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, सोशल मीडियावरील ट्रोलिंगला मी कधीच प्रत्युत्तर दिलेले नाही.

प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी, एजाज खान यांची मुख्य भूमिका असलेली सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या वेबसिरिजचे दिग्दर्शन नागेश कुकुनूरने केले असून या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे आणि त्यातही या वेबसिरिजमधील एक दृश्य पाहून प्रिया बापटच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच सौज्वळ, गर्ल टू नेक्स्ट डोअर अशा भूमिका साकारणाऱ्या प्रियाने चक्क या वेबसिरिजमध्ये एक बोल्ड दृश्य दिले आहे. सिटी ऑफ ड्रीम्स या बेवसिरिजमध्ये गीतिका त्यागीसोबत प्रियाचा बोल्ड सीन असून यावरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.


याबद्दल तिने नुकतेच लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, सोशल मीडियावरील ट्रोलिंगला मी कधीच प्रत्युत्तर दिलेले नाही. पूर्वी देखील माझ्या कपड्यांवरून मला ट्रोल करण्यात आले होते. मी छोटे कपडे का घालते असे प्रश्न देखील मला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आले आहे. पण यावर काहीही न बोलता केवळ आपण आपले काम केले पाहिजे असे मला वाटते. प्रेक्षकांनी ड्रीम ऑफ सिटी ही वेबसिरिज पाहिली तरच यात हे बोल्ड दृश्य का आहे हे लोकांना कळेल. 

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट आता नागेश कुकुनूर यांच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या हिंदी वेबसिरीजद्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले आहे. या वेबसिरीमध्ये तिची भूमिका आजवरच्या तिच्या सगळ्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पौर्णिमा गायकवाड नावाच्या कणखर आणि महत्वकांक्षी मुलीची व्यक्तिरेखा ती यात साकारत आहे. घर सांभाळणारी सर्वसाधारण गृहिणी ते सत्ता सांभाळणारी जिद्दी, महत्त्वकांक्षी राजकारणी अशा तिच्या दोन वेगवेगळ्या छटा या वेबसिरीजमधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत. भावासोबत असणाऱ्या या राजकीय खेळीत कोण विजयी होईल, हे प्रेक्षकांना 'सिटी ऑफ ड्रीम्स' पाहिल्यावरच कळेल.



 

Web Title: priya bapat gets trolled due to lesbian scene in city of dreams