होय... हे खरे आहे. आपली ब्युटिक्वीन चुलबुली गर्ल प्रिया बापट गच्चीमध्ये आहे. आता गच्चीवर ...
गच्चीमध्ये प्रिया बापट
/> होय... हे खरे आहे. आपली ब्युटिक्वीन चुलबुली गर्ल प्रिया बापट गच्चीमध्ये आहे. आता गच्चीवर प्रिया काय करतेय असे तर तिच्या चाहत्यांना वाटणे साहजिकच आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे अन म्हणुनच प्रिया मस्तपैकी गच्चीवर समर सीजन तर एॅन्जॉय करीत नाही ना असे जर वाटत असेल ते ही चुकिचे आहे. तर ऐका आपली ही सोज्वळ प्रिया बापट गच्चीमध्ये आहे याचा अर्थ ती गच्ची या आगामी चित्रपटामध्ये आहे. सीएनएक्सने नूकतेच तुम्हाला सांगितले होते की प्रिया तिच्या प्रोजेक्टसाठी, आगामी चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे म्हणुन. आता ती कोणत्या चित्रपटासाठी एवढी एक्सायटेड होती माहितीय का तुम्हाला. तर प्रियाच्या आगामी चित्रपटाच्या नावाचा खुलासा झाला असुन या सिनेमाचे नाव आहे गच्ची. नाव तर खरच खुप भारी अन क्युरस वाटत आहे. नावावरुनच हा सिनेमा इंटरेस्टींग वाटतोय. गच्ची हा विषयच खरतच सगळ््यांच्या आवडता अन जवळचा असा आहे. गच्चीवर अनेक प्रेमप्रकरणे देखील खुललेली आहेत. मग् अशीच काहीशी स्टोरी आपल्याला यामध्ये दिसणार आहे की काही डिफरंट कथा आपल्यासामेर येईल हे तर चित्रपट पाहिल्यावरच समजेल. नचिकेत सामंंत दिग्दर्शित या सिनेमात प्रियाचा कोस्टार आहे अभय महाजन. आता प्रियाची लव्ह स्टोरी सुद्धा गच्चीवर खुलतीये का हे या चित्रपटातून आपल्याला समजेल.