प्रिया बापटचा व्हॅकेशन मूड ऑन, निसर्गाच्या सानिध्यात करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:50 IST2019-09-25T18:45:50+5:302019-09-25T18:50:23+5:30

अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

Priya bapat enjoying vacation in himachal pradesh | प्रिया बापटचा व्हॅकेशन मूड ऑन, निसर्गाच्या सानिध्यात करतेय एन्जॉय

प्रिया बापटचा व्हॅकेशन मूड ऑन, निसर्गाच्या सानिध्यात करतेय एन्जॉय

अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. सध्या प्रिया हिमाचलमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. इन्स्टाग्रामवर प्रियाने हिमाचलमध्ये फोटो शेअर केले आहे. एका फोटोमध्ये प्रिया तिर्थन नदीच्या काठावर बसलेली दिसते आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियाचा बर्थडे झाला. बर्थडे सेलिब्रेशनसाठी प्रिया हिमालयाच्या कुशीत गेली आहे. 


प्रियाने चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. नवा गडी नवं राज्य या नाटकात तसेच अधुरी एक कहानी, शुभंकरोती, दे धमाल, आभाळमाया यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नागेश कुकुनूर यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे. 

Web Title: Priya bapat enjoying vacation in himachal pradesh