ही चिमुरडी करतेय आज मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य, हिंदी चित्रपटांमध्येही केलंय काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 16:25 IST2021-02-05T16:25:00+5:302021-02-05T16:25:01+5:30
या अभिनेत्रीला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

ही चिमुरडी करतेय आज मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य, हिंदी चित्रपटांमध्येही केलंय काम
उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. प्रियाने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिची सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसिरिज तर चांगलीच गाजली होती. प्रिया तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे, तिच्या कुटुंबियांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने नुकताच शेअर केलेला एक फोटो तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रियाने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला चिमुकली प्रिया तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. मी आणि माझे बाबा असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे. या फोटोत प्रिया खूपच क्यूट दिसत असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. प्रिया आज जितकी सुंदर दिसते तितकीच ती लहानपणीदेखील दिसत असे हेच हा फोटो पाहून तिचे चाहते सांगत आहेत. हा फोटो प्रियाने शेअर केल्यानंतर केवळ एका दिवसांत या फोटोला अनेक लाईक्स मिळाले आहेत.
प्रिया बापट लवकरच एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिनेच नुकतेच याविषयी सांगितले आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया खूपच उत्सुक असल्याचे तिने सांगितले होते.
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.