"नाट्यगृह स्वच्छ ठेवणं ही...", प्रेक्षकांनी टाकलेला कचरा पाहून संतापली प्रिया बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 12:24 PM2024-01-26T12:24:44+5:302024-01-26T12:30:55+5:30

प्रिया-उमेशची जोडी "जर तर ची गोष्ट" या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Priya Bapat Angry Post After Seeing Garbage In Drama Theater | "नाट्यगृह स्वच्छ ठेवणं ही...", प्रेक्षकांनी टाकलेला कचरा पाहून संतापली प्रिया बापट

"नाट्यगृह स्वच्छ ठेवणं ही...", प्रेक्षकांनी टाकलेला कचरा पाहून संतापली प्रिया बापट

मराठी इंडस्ट्रीतील 'क्यूट कपल' म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामत. दोघेही मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. प्रिया-उमेशची जोडी "जर तर ची गोष्ट" या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकताच तिच्या नाटकाचा एक प्रयोग पार पडला. यावेळी नाट्यगृहात प्रेक्षकांनी टाकलेल्या कचऱ्याला पाहून प्रिया संतापली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं प्रेक्षकांना सुनावलं.

प्रिया बापट सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. प्रियाने इन्स्टाग्रामवर केलेल्या फोटोमध्ये रिकाम्या बाटल्या व कचरा दिसत आहे. यावर प्रियाने या सर्व प्रेक्षकांची कानउघडणी करत तो कचरा कचरापेटीत टाकावं, म्हणत संताप व्यक्त केला आहे. पोस्ट शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा, नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार?'.

प्रिया वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि नाटक अशा चारही माध्यमांतून प्रिया बापटने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'प्रोडक्शन नंबर ८' या बॉलिवूड सिनेमात तिची वर्णी लागली आहे. सेजल सेठ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये प्रिया अभिनेता नवाजु्द्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ९०च्या काळातील गोष्ट या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे.

Web Title: Priya Bapat Angry Post After Seeing Garbage In Drama Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.