प्रिया बापट उमेश कामतला म्हणतेय, "आणि काय हवं?" वाचा काय आहे ही भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 17:32 IST2019-07-09T17:28:07+5:302019-07-09T17:32:45+5:30

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात

Priya bapat and umesh kamat working together shared photo social media | प्रिया बापट उमेश कामतला म्हणतेय, "आणि काय हवं?" वाचा काय आहे ही भानगड

प्रिया बापट उमेश कामतला म्हणतेय, "आणि काय हवं?" वाचा काय आहे ही भानगड

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो, व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात. आपल्या खासगी जीवनातील बऱ्याच गोष्टीसुद्धा मनमोकळेपणाने दोघं इथं फॅन्ससह शेअर करतात. अशीच एक खास बाब प्रिया बापटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केली आहे. सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. ''उमेश आणि मी पुन्हा एकत्र! #आणि काय हवं,,?'' असे कॅप्शन या फोटोला प्रियाने दिले आहे.  कथा, दोघांची भूमिका याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही आहे. 


2013 साली 'टाईम प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया ही गोड जोडी एकत्र झळकली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र  झळकले नाहीत. त्यामुळे हे दोघेही कधी ऑनस्क्रीन पाहायला मिळणार याचीच चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आणि अखेर चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असेच प्रियाच्या पोस्टमधून समजतंय. तुर्तास ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच फॅन्सकडून आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून दोघांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. 

Web Title: Priya bapat and umesh kamat working together shared photo social media