पुन्हा एकदा 'आणि काय हवं' म्हणत प्रिया बापट आणि उमेश कामत जुई आणि साकेतच्या रूपात भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 17:28 IST2021-07-26T17:26:10+5:302021-07-26T17:28:48+5:30

ऑफस्क्रीन जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'आणि काय हवं' मधील जुई आणि साकेत लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत.

Priya Bapat and Umesh Kamat reprise their roles as Jui and Saket are back with Aani Kay Hava 3 | पुन्हा एकदा 'आणि काय हवं' म्हणत प्रिया बापट आणि उमेश कामत जुई आणि साकेतच्या रूपात भेटीला

पुन्हा एकदा 'आणि काय हवं' म्हणत प्रिया बापट आणि उमेश कामत जुई आणि साकेतच्या रूपात भेटीला

लग्न म्हणजे नव्या आयुष्याची नव्या अनोळखी माणसासोबतची सुरुवात. लग्नानंतरच्या आयुष्यात फार वेळ एकत्र घालवला असला तरी  आपण आपल्या जोडीदाराला पूर्णपणे ओळखणं कठीणच असत. अश्यात आयुष्यात नेहमीच काही ना काही राहिल्यासारखं वाटत, कुठेतरी एक भीती असते, तर कधी काही इच्छा अपूर्ण असतात, आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टी माहिती नसतात पण जुई आणि साकेतचं मात्र काहीस वेगळं आहे. त्या दोघांच नातं हे प्रेम, विश्वास आणि थोड्या मस्तीने परिपूर्ण आहे. या नात्याचा गोड प्रवास  आणि काय हवं'? च्या निमित्ताने प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या एका भन्नाट  वेबसिरीजमध्ये आपण अनुभवला आहे.

 

जुई आणि साकेत यांच्या लग्नानंतरच्या जिव्हाळ्याच्या आणि मस्तीच्या नात्याची सुवर्ण आणि गोड सफर रसिकांनी या वेबसिरी-या दुसर-या पर्वातून अनुभवली होती.लग्नानंतर नातं घट्ट होत असताना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टींच्या या सफरीचा गोडवा रसिकांच्याही प्रचंड पसंतीस पात्र ठरला होता. पहिला आणि दुसरा भाग सुपरहिट ठरल्यानंतर आता तिसरा भाग रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपल्या सर्वांची आवडती ऑफस्क्रीन जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'आणि काय हवं' मधील जुई आणि साकेत लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि अ मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन वर 'आणि काय हवं'चा तिसरा सीझन लवकरच येत आहे.  

'आणि काय हवं'चा पहिला सिझन आला आणि बघता बघता त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. जुई आणि साकेत प्रत्येकालाच आपल्या घरातीलच एक वाटू लागले. अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले. आता परत ते आपल्या भेटीला येत आहेत. त्यांचे रुसवे फुगवे, त्यांच्या आयुष्यातील गंमतीजंमती, त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वरूण नार्वेकर दिग्दर्शित या गोड आणि गुणी जोडप्याची गोष्ट असलेल्या ‘आणि काय हवं' सिझन ३ चा ट्रेलर २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Web Title: Priya Bapat and Umesh Kamat reprise their roles as Jui and Saket are back with Aani Kay Hava 3