सिंगापूरच्या रस्त्यावर प्रिया बापट आणि उमेशने बनवला भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:40 IST2025-01-23T12:40:40+5:302025-01-23T12:40:59+5:30

प्रिया आणि उमेश सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त सिंगापूरला गेले आहेत. इथे त्यांनी भन्नाट रील बनवला आहे. याचा व्हिडिओ प्रियाने शेअर केला आहे. 

priya bapat and umesh kamat reel video on trending music goes viral | सिंगापूरच्या रस्त्यावर प्रिया बापट आणि उमेशने बनवला भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

सिंगापूरच्या रस्त्यावर प्रिया बापट आणि उमेशने बनवला भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

प्रिया बापट आणि उमेश कामत हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते नाटक, सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. प्रिया आणि उमेश सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त सिंगापूरला गेले आहेत. इथे त्यांनी भन्नाट रील बनवला आहे. याचा व्हिडिओ प्रियाने शेअर केला आहे. 

या व्हिडिओत प्रिया आणि उमेश डान्स करताना दिसत आहेत. तर त्यांना पल्लवी पाटील आणि आशुतोष गोखले यांनीही उत्तम साथ दिली आहे. इन्स्टावरील ट्रेंडिग म्युझिकवर त्यांनी रील बनवला आहे. "जेव्हा सिंगापूरमध्ये एक रील बनवण्यासाठी वेळ काढतो", असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी पाटील आणि आशुतोष गोखले जर तर ची गोष्ट या नाटकाच्या निमित्ताने सिंगापूर दौऱ्यावर आहेत. लवकरच हे नाटक २०० प्रयोगाचा टप्पा गाठणार आहे. 
 

Web Title: priya bapat and umesh kamat reel video on trending music goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.