साडीत खुललं प्रार्थना बेहरेचं सौंदर्य, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 17:45 IST2021-01-11T17:45:00+5:302021-01-11T17:45:02+5:30

प्रार्थना बेहरेने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली.

Prathna behre looks beautiful in saree | साडीत खुललं प्रार्थना बेहरेचं सौंदर्य, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

साडीत खुललं प्रार्थना बेहरेचं सौंदर्य, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

प्रार्थना बेहरेने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. ' त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. 


प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रार्थना सतत आपलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. प्रार्थनाने खणाच्या साडीतला एक ब्लॅक एंड व्हाईट फोटो सोशल मीडियावर केला आहे. साडीत प्रार्थनाचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे. नेहमीप्रमाणे फॅन्सनी प्रार्थनाच्या या फोटोशूटला देखील दाद दिली आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.

Web Title: Prathna behre looks beautiful in saree