प्रार्थना बेहरेने केलं नवं फोटोशूट, दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 17:42 IST2019-11-05T17:41:04+5:302019-11-05T17:42:02+5:30

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये असून ती एका चित्रपटाचं शूटिंग करते आहे.

Prathana Behare new photoshoot, she looked very glamrous | प्रार्थना बेहरेने केलं नवं फोटोशूट, दिसली ग्लॅमरस अंदाजात

प्रार्थना बेहरेने केलं नवं फोटोशूट, दिसली ग्लॅमरस अंदाजात

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये असून ती एका चित्रपटाचं शूटिंग करते आहे. भलेही ती लंडनमध्ये असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. प्रार्थनाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. 

प्रार्थनाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसते. या फोटोत तिने निळ्या व ग्रीन रंगाचा गाऊन परिधान केला आहे. 

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी प्रार्थनाने जिंकली आहेत. प्रार्थना सध्या आपल्याला खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.

ती तिच्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देत असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या पतीसमवेत घालवत आहे. प्रार्थनाचे लग्न अभिषेक जावकरसोबत गेल्या वर्षी झाले. त्यांनी गोव्यात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न केले.

अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.


प्रार्थनाने 'पवित्र रिश्ता' या प्रसिद्ध हिंदी मालिकेद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिची पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

त्यानंतर तिने 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. प्रार्थनाने मालिका आणि रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केली आहे. 

Web Title: Prathana Behare new photoshoot, she looked very glamrous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.