​ प्रशांत दामले साखर खाऊन रंगभूमी गाजवायला सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 12:56 IST2016-12-09T12:56:07+5:302016-12-09T12:56:07+5:30

प्रशांत दामले नेहमीच त्यांच्या नाटकांमधून रसिकांसाठी नवीन मेजवानी घेऊन येत असतात. रंगभूमीला अनेक दर्जेदार नाटके बहाल केलेले प्रशांत दामले ...

Prashant ready to take part in theater by consuming sugar yogurt and sugar | ​ प्रशांत दामले साखर खाऊन रंगभूमी गाजवायला सज्ज

​ प्रशांत दामले साखर खाऊन रंगभूमी गाजवायला सज्ज

रशांत दामले नेहमीच त्यांच्या नाटकांमधून रसिकांसाठी नवीन मेजवानी घेऊन येत असतात. रंगभूमीला अनेक दर्जेदार नाटके बहाल केलेले प्रशांत दामले आता तर साखर खाऊन रंगमंच हादरवालया सज्ज झाले आहेत. होय, प्रशांत दामलेंचे नवीन नाटक साखर खाल्लेला माणूस रंगमंचावर येत आहे. प्रत्येक नाटकात वेगळेपण जपणारे दामले या नाटकात देखील हटके अंदाजात नाट्यरसिकांना दिसणार असल्याचे कळतेय. या नाटकामध्ये आपल्याला प्रशांत दामलें सोबतच आघाडीच्या अभिनेत्री शुभांगी गोखले, रुचा आपटे, संकर्षण कºहाडे पाहायला मिळणार आहेत. एकदंतची निर्मिती असलेले हे नाटक प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन सादर करणार आहेत. नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आहेत. तसेच विदयासागर अध्यापक यांनी हे नाटक लिहिलेले आहे. प्रसिदध संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत या नाटकाला आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांचे वाडा चिरेबंदी हे नाटक सध्या धमाल करत आहे. या नाटकाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रभर सुरु असतानाच आता पुन्हा एकदा चंद्रकांत कुलकर्णींनी हे नव्या आशयाचे भन्नाट नाटक प्रेक्षकांसाठी आणले आहे. या नाटकाचे नाव पाहता यामध्ये नक्कीच काहीतरी धमाल, विनोदी आपल्याला अनुभवण्याची संधी मिळाणार असे दिसतेय. सध्या नोटा बंदीच्या त्रासामुळे अनेक नाटकांचे प्रयोग पुढे ढकलण्यात आले आहेत तर काही नाटकांना प्रेक्षकांचा हवा तितका प्रतिसाद मिळत नाही. अशामध्येच आता हे नवे कोरे नाटक प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे परत वळविण्यासाठी यशस्वी ठरणार का हे लवकरच समजेल. 

Web Title: Prashant ready to take part in theater by consuming sugar yogurt and sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.