शब्द अपूर्ण पडतील तुमच्यासाठी..., प्रसाद ओकच्या पत्नीसोबतच्या फोटोशूटवर चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:21 IST2022-08-16T14:53:06+5:302022-08-16T15:21:14+5:30
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तीदेखील कलाविश्वात सक्रीय आहे.

शब्द अपूर्ण पडतील तुमच्यासाठी..., प्रसाद ओकच्या पत्नीसोबतच्या फोटोशूटवर चाहते झाले फिदा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक (Prasad oak)अभिनयापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रसादने आता दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसाद कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट आणि कुटुंबाविषयीची माहिती शेअर करत असतो.
प्रसाद ओकने सोशल मीडियावर पत्नी मंजिरी ओक(manjiri oak)सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रसादने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. शब्द अपूर्ण पडतील तुमच्यासाठी एवढे गोड दिसता तुम्ही एकत्र असलात की best couple ever and the Marathi उर्फ पुणेरी पॉवर couple, लयी भारी झकास जोडी, लव्हली कपल अशा कमेंट्स चाहत्यांनी प्रसाद आणि मंजिरीच्या या फोटोंवर केल्या आहेत.
दरम्यान, अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तीदेखील कलाविश्वात सक्रीय आहे. मंजिरी ही प्रसादसोबत अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. शिवाय बिझनेस वुमन अशीही तिची ओळख आहे. इतकंच नाही तर ती अनेक ब्रँडचं प्रमोशनही करत असते त्यामुळे सध्याच्या घडीला चर्चेत राहणाऱ्या मराठी सेलिब्रिटींमध्ये तिचं आवर्जुन नाव घेतलं जातं.