भारीच ! Mr & Mrs प्रसाद ओकने केला 'कच्चा बदाम गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:55 IST2022-02-18T17:29:00+5:302022-02-18T18:55:53+5:30

‘कच्चा बादाम’ या गाण्यानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. या गाण्यावरचे असंख्य रील्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाही.

Prasad Oak with his wife song on kacha badam video viral | भारीच ! Mr & Mrs प्रसाद ओकने केला 'कच्चा बदाम गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

भारीच ! Mr & Mrs प्रसाद ओकने केला 'कच्चा बदाम गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘कच्चा बादाम’ या गाण्यानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. या गाण्यावरचे असंख्य रील्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल प्रासद ओक (Prasad oak) आणि मंजिरी ओक (Manjiri oak) यांनाही ‘कच्चा बादाम’ या गाण्यानं भुरळ घातली आहे.

‘कच्चा बादाम’ वर प्रसाद आणि मंजिरी यांनी धम्माल डान्स केला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या डान्समध्ये शेवटी प्रसाद गणपती डान्स करायला सुरुवात करतो यावर मंजिरी त्याला मारताना दिसतेय.  यावरच्या प्रतिक्रियाही तितक्याच भन्नाट आहे. Birthday असला म्हणून काय झालं Torture तर मी करणारच😜आणि reel तर झालचं पहिजे असं मंजिरी ओकने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.

कमाल, मस्त फुल 2 धमाल, भारीच, काय प्रसाद भाऊ शेवटी भारीच केलं राव अशा कमेंट्स चाहते या व्हिडीओ करत आहेत. दिग्दर्शन, अभिनेता, सुत्रसंचालक अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओक (Prasad Oak) नेहमीच चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतो. मालिका,टीव्ही शो, सिनेमा असो प्रसादने सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.प्रसादने आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे. मंजिरी ही प्रसादसोबत अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. शिवाय बिझनेस वुमन अशीही तिची ओळख आहे. सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून ती छोट्या उद्योजकांना मदत करते.

‘कच्चा बादाम’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या गाण्याला लाखो व्हयुज मिळाले आहे. बंगाली भाषेतील या गाण्याचे वेगवेगळ्या भाषेत व्हर्जन्ही तयार झाले आहेत. काहींनी त्यावर रील्सही बनवले आहेत. शेंगा विकणाऱ्या एका विक्रेत्यानं हे गाणं गायलं आहे. पश्चिम बंगालमधील कुरालगुजरी गावांत राहणाऱ्या त्या गायकाचे नाव भुवन बादायकर असे आहे.

Web Title: Prasad Oak with his wife song on kacha badam video viral