प्रसाद व मंजिरी ओक यांनी मस्काराचा साजरा केला वाढदिवस! नटापटा करुन 'गुलाबी साडी' गाण्यावर बनवलं रील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:39 IST2024-05-09T16:38:35+5:302024-05-09T16:39:50+5:30

प्रसाद ओकच्या घरी एक पेट आहे आणि ज्याचं टोपणनाव मस्कारा असं आहे.

Prasad and Manjiri Oak celebrates pet Mascara ’s birthday with heartwarming video | प्रसाद व मंजिरी ओक यांनी मस्काराचा साजरा केला वाढदिवस! नटापटा करुन 'गुलाबी साडी' गाण्यावर बनवलं रील

प्रसाद व मंजिरी ओक यांनी मस्काराचा साजरा केला वाढदिवस! नटापटा करुन 'गुलाबी साडी' गाण्यावर बनवलं रील

मराठी मनोरंजन विशावतील अनेक कलाकार मंडळी ही प्राणीप्रेमी आहेत. अनेक कलाकारांकडे कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी आहेत आणि या प्राण्यांची ही कलाकार मंडळी अगदी एखाद्या व्यक्तीप्रमाणे जपणूक करतात. अशाच काही कलाकारांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक. नुकतेच प्रसाद आणि मंजिरी यांनी त्यांच्या पाळीव श्वान मस्काराचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

प्रसाद ओकच्या घरी एक पेट आहे आणि ज्याचं टोपणनाव मस्कारा असं आहे. मस्कारा त्यांच्या कुटुंबाचीच एक सदस्य आहे. म्हणून ओक कुटुंब नेहमी मस्काराबरोबरचे खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशातच नुकताच मस्काराचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशनदेखील झालं. मस्कारासाठी एक खास केक आणण्यात आला आणि डेकोरेशन केलेलं पाहायला मिळालं.  

मस्काराला अभिनत्री अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर दोघींनी शुभेच्छा दिल्या आहेत. सईनं मस्काराचा फोटो पोस्ट करत लिहलं,  'पाशजी के जिगर का तुकडा.. मस्कारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!'. तर अमृतानं व्हिडीओ कॉल करुन मस्काराला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या. व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. त्यात तिनं लिहलं, 'तु मला इतकं प्रेम दिलं, त्यासाठी तुझे आभार. माझ्या क्युटीला वाढदिवसाच्या शुभेच्छा... अम्मू मावशी लव्ह्स यू'. 

एवढचं नाही तर मस्कराचा सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्यावर एक खास व्हिडीओही बनवण्यात आला आहे. ज्यामध्ये तिचा नटापटा केल्याचं दिसून येतंय. मस्काराला गुलाबी फ्रॉक, गुलाबी टिकली अन् गळ्यात माळही घातल्याचं दिसून येत आहे.  या व्हिडीओमध्ये मस्कराना चालताना दिसते. कधी पोज देताना दिसते. या व्हिडीओवर अभिनेता स्वप्नील जोशी, लोकप्रिय लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी कमेंट करत मस्काराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: Prasad and Manjiri Oak celebrates pet Mascara ’s birthday with heartwarming video