प्रार्थना बेहेरेच्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 07:15 IST2020-02-09T07:15:00+5:302020-02-09T07:15:00+5:30

प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला

Prarthana behere share her new photoshoot on instagram | प्रार्थना बेहेरेच्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा, पाहा तिचे फोटो

प्रार्थना बेहेरेच्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा, पाहा तिचे फोटो

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.  प्रार्थना तिच्या ट्रेडिशनल लूकमधले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसते आहे. प्रार्थनच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.


प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

Web Title: Prarthana behere share her new photoshoot on instagram