प्रार्थना बेहेरच्या या फोटोची पडली फॅन्सना भुरळ, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 16:51 IST2019-09-17T16:48:27+5:302019-09-17T16:51:17+5:30

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय आहे.

Prarthana behere share her new photo on social media | प्रार्थना बेहेरच्या या फोटोची पडली फॅन्सना भुरळ, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

प्रार्थना बेहेरच्या या फोटोची पडली फॅन्सना भुरळ, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. 


प्रार्थनाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिने व्हाईट रंगाचा टॉप परिधान केला आहे. या फोटोत ती बोल्ड दिसते आहे. 


प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. 

Web Title: Prarthana behere share her new photo on social media